सदगुरु पादुका

सदगुरु पादुका
सदगुरु पादुका

शुक्रवार, ८ फेब्रुवारी, २०१९

गुरु चरण भज नित बंधू, मन उत्तुंग स्थितीपर जाईयो




गुरु चरण भज नित बंधू, मन उत्तुंग स्थितीपर जाईयो ||

गुरु चरण स्मर नित बंधू, मन संकल्प शुभ नित पाईयो || धृ.|| 



गुरु नाम, रखियो मुख, हृदयन गुरु छबी बिराजीयो || 

कर ताल दिय गुरु भजन, सब शांत सुख रस पाईयो ||



आकाश पृथ्वी आपe पर जिसकी सत्ता छायी हो |

अणु मात्र बन जो विश्व सारा ग्रास कर खा जाईयो |

उस गुरु की शरण तू जाय बंधू, मृत्यु भय तू निवारियो || 



गुरु प्रेम धर, गुरु साक्ष रख, विश्वास धर गुरु बात पर |

गुरु कार्य कर, गुरु चरण स्मर गुरु नाम जप हर सांस पर |

भज आत्ममग्न प्रभु चिरंतन जन्म मरण निवारियो ||


शनिवार, १५ जानेवारी, २०११

राम राम राम अवघेचि म्हणती कोणी न जाणती आत्माराम!


राम राम राम अवघेचि म्हणती, 

कोणी न जाणती आत्माराम !!



राम हा कालचा सूत दशरथाचा, अनंत युगांचा आत्माराम!
राम राम राम अवघेचि म्हणती कोणी न जाणती आत्माराम!

रामासी हा राम ठावे जरी असता, शरण का जाता वसिष्ठासी!
राम राम राम अवघेचि म्हणती कोणी न जाणती आत्माराम!

तुका म्हणे राम तुझा तुजपाशी, पुसुनी घेशी गुरुमुखे!
राम राम राम अवघेचि म्हणती कोणी न जाणती आत्माराम!

शुक्रवार, २४ डिसेंबर, २०१०

||नमो गुरवे वासुदेवाय||

  कधीतरी या जग रहाटीचा खूप कंटाळा येतो.... वाटत... आपण उगीचच गुंतवून घेतोय स्वतःला... सारखी तीच ती माणस, तीच नोकरी तेच एक घर.... या सगळ्या रुटीनचा जाम वैताग येतो.. आणि मग त्या सगळ्यातून बाहेर पडायला मन धडपडू लागत.

    वास्तविक मनात असा विचार येईपर्यंत ते स्वतः इतक्या जणांच्या हातात हात गुंफून चालत असत आणि पायात इतके पाय अडकलेले असतात... की त्याला त्याचे स्वतःचेच हात-पाय सापडत नाहीत. मुखवटे किती?? ते तर विचारुच नये...!!  चेहऱ्यामागून चेहरे बदलत जातात. आणि खरा चेहरा, ज्याने तो कोणी एक विश्वात्मक आपल्याला ओळखत असतो तो आपल्या लक्षातच राहत नाही. एक हात सापडला तर दुसरा नाही सापडत. एक पाय सोडवू तर दुसरा गुंतून राहतो.  एक चेहरा लावू जावं आणि स्वतःला निरखावं मनाच्या आरशात तर आपणच आपल्याला अनोळखी दिसू लागतो.. मग आपली खरी ओळख आपल्याला व्हायची कधी? केव्हा? कुठे?? नुसते प्रश्न आणि प्रश्न.. उत्तरांच काय..??

    अशा वेळी त्या विश्वात्मकालाच साकड घालावं.. त्याचेच पाय धरावेत आणि सांगाव बाबा रे तू दिलेला माझा खरा चेहरा कधी कुठे हरवला ते कळलंच नाही. मायेच्या खेळात आनंदात न्हाताना.. मी आणि माझं जोपासताना जो खरा माझा , त्या तुला कधी स्मरलंच नाही. पण आतातरी तुझ्या सर्वसाक्षी अस्तित्वाची थोडी फार जाणीव होऊ लागलीये. मला सामावून घे तुझ्या विशाल बाहुपाशांत.  माझी गेलेली ओळख परत येऊ दे. स्मृती-भ्रंश झालाय मला.  भलतीकडेच लक्ष राहील आणि भलं तिकडे नजर वळलीच नाही...  आता तरी मुखातून तुझं नाम येतंय.. त्या नामातून तुझं सगुण रूप माझ्या चित्तात पाझरू दे आणि तो भक्तीचा पाझर मला तुझ्या निर्गुणाकडे घेऊन जाऊदे....

||नमो गुरवे वासुदेवाय||